मनोगत
आपली संस्था या वर्षी ५२ व्या वर्षात पदार्पण करीत असून दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी ५२ वा वार्षिक अहवाल आपणापुढे सादर करताना आनंद होत आहे.

                    सनी दिलीप कदम
सुस्वागतम्
परिपत्रक
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची पतसंस्था मर्यादितच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेच्या ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक ०३/०६/२०२३ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड पुणे येथे आयोजित केली आहे. सदर सभेत पुढील विषयपत्रिकेवरील विषयांचा विचार होऊन निर्णय घेणार आहोत. तरी सर्व सभासदांनी वेळेत हजार राहून सहकार्य करावे.
विषयपत्रिका-
१) दिनांक ३०.०४.२०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा सभावृत्तांत वाचून मान्यता देणे व कायम करणे.
२) सन २०२२ -२०२३ या आर्थिक वर्षाच्या संचालक मंडळाच्या कामकाजाच्या अहवालास मान्यता देणे.
३) दिनांक ३१.३.२०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा हिशोब पत्रकास (नफा तोटा पत्रक, ताळेबंद) स्विकृती देणे.
४) दिनांक ३१.३.२०२३ रोजी अखेर संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार नफा विभागणीस मान्यता देणे व लाभांश जाहीर करणे.
५) सन २०२२-२०२३ सालात संचालक मंडळाने घेतलेल्या संचालक मंडळाची माहिती घेवुन मान्यता देणे.
६) सन २०२२-२०२३ चे अर्जपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मान्यता देणे.
७) सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाकरिता मा. संचालक मंडळाने तयार केलेल्या अर्जपत्रकास मान्यता देणे.
८) सन २०२३-२०२४ या साला करिता वैधानिक लेखापरीक्षकाची व अंतर्गत लेखापरीक्षकाची नेमणूक करून त्यांचे मानधन ठरवणे.
९) सन २०२२-२०२३ चे वार्षिक लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून अहवाल दप्तरी दाखल करणे.
१०) उपविधी क्रं.क -१.३ व फ -१.१० दुरुस्ती बाबत (सोबत जोडलेले प्रमाणे).
११) शासन पत्रिकेच्या अधिन राहून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना संस्थेचे नाममात्र सभासद करून त्यांच्या ठेवी स्विकारणे बाबत विचार करणे.
१२) मा. अध्यक्षसाहेब यांचे परवानगीने येणाऱ्या ऐनवेळेच्या विषयांवर विचार विनिमय करून निर्णय घेणे.
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका
  • सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या.
  • शुभम गॅलेरीया,गाळा क्र.१०१,पहिला मजला,क्रोमा शोरूमचे वर,पिंपरी स्टेशन,पुणे-१८ .
  • फोन नं. ०२०- २७४६००४४/४५